माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाड येथील क्रांती भूमी असलेले चवदार तळे येथे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी राहून या महामानवाला पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चवदार तळ्यावर ‘भव्य भीमसृष्टी’ची उभारणी करण्याचा आपला मानस आहे.