जळगाव: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरात पोलिसांचा रूट मार्च
नवरात्र उत्सवानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यात सार्वजनिक मंडळातर्फे 91 ठिकाणी व खाजगी 49 ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आलेली आहे. उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मुक्ताईनगर शहरातील मुख्य मार्गांवरून रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला अशी माहिती दिनांक 22 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आली.