केज: वंदे मातरमच्या 150 वर्षानिमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी उपस्थितीत सामूहिक गान कार्यक्रम संपन्न झाला
वंदेमातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण प्रित्यर्थ आज बीड येथे जिल्हा क्रीडा संकुल जालना रोड या ठिकाणी वंदेमातरम गीताचा सामूहिक गान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले प्रत्येकाच्या नसा-नसामध्ये वंदेमातरम हे असले पाहिजे. आज या गीता करिता शासकीय आयटीआय बीड व शासकीय आयटीआय मुलींची बीड या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी सर्वच शाळांना आमंत्रित करण्यात आले होते.