कामठी: आर्मी कंटोन्मेंट एरिया येथून दागिने चोरी झाल्याने उडाली खळबळ, जुनी कामठी ठाण्यात गुन्हा दाखल
Kamptee, Nagpur | Oct 20, 2025 दोन एप्रिल 2025 रोजी सौ भावना त्यागी यांनी त्यांचे सोन्याचे तसेच चांदीचे वेगवेगळे दागिने घरातील लाकडी बेट च्या आत मध्ये ठेवले होते. 18 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी चार वाजता च्या सुमारास त्यांनी ज्या ठिकाणी दागिने ठेवले त्या ठिकाणी पाहिले असता ते दागिने दिसले नाही. अज्ञात आरोपीने त्यांचे सोन्याचे 205 ग्रॅम वजनाचे दागिने आणि चांदीचे वेगवेगळे दागिने असा एकूण दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.