सातारा: आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास 18 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा उपोषण करते अनिल काजारी यांचा जिल्हाधिकारी यांना इशारा
Satara, Satara | Sep 16, 2025 कोयना भूकंप निधी मध्ये झालेला भ्रष्टाचार बाबत जिल्हाधिकारी कार्यासमोर अनिल बाबुराव काजारी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, मागील आठ दिवसांपासून या उपोषणाची शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही, उपोषणामुळे माझी तबीयत खालावली असून, माझ्या जीवितास जर का बरे वाईट काही झाले तर त्याला जिल्हा प्रशासन व पालकमंत्री जबाबदार राहणार असल्याचे उपोषणकर्ते अनिल काजारी यांनी आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषण स्थळी सांगितले.