समुद्रपूर: बरबडी येथे नदीच्या काठावरील शेतात वाघाच्या हल्ल्यात गाय व कालवड ठार:वाघ वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद
समुद्रपूर तालुक्यातील बरबडी येथील शेतकरी नरेंद्र घोडे यांच्या नदीच्या काठावर शेतामध्ये चरत असलेल्या जणावरांपैकी वाघाने एका गाय व कालवडीवर हल्ला चढवित ठार केले.हा वाघ दुसऱ्या दिवशी रात्री वनविभागाच्या वतीने याठिकाणी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे यांनी दिली आहे.यामुळे नदी परीसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवस शेतामध्ये जनावरे बांधू नये व शेतात जातांना खबरदारी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.