महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमसोबत (EVM) 'व्हीव्हीपॅट' (VVPAT) यंत्राचा वापर न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा आणि इतर संलग्न संघटनांनी दिला आहे. यासंदर्भात दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले असून, डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या नगर परिषद..