दिग्रस येथील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले केंद्रप्रमुख गिरीश किसन राव दुधे आणि त्याचा भाऊ शिक्षक विनोद किसन राव दुधे यांना आज शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ०५;३० वाजताच्या दरम्यान दारव्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडी १३ जानेवारीपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी ०६ जानेवारी रोजी गिरीश व विनोद दुधे यांना अटक केली होती. यापूर्वी न्यायालयाने ०९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.