अलिबाग: अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शहराचा कायापालट केला
शेकाप नेते जयंत पाटील
Alibag, Raigad | Nov 10, 2025 अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शहराचा एक वेगळा कायापालट केला आहे. अलिबाग शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे राज्यामध्ये अलिबाग शहराचे नाव कायमच घेतले जाते. महाविकास आघाडी एकत्र आल्याने आपला विजय हा निश्चित झाला आहे. मात्र, गाफील न राहता, काम करायचे आहे. प्रचारासाठी कालावधी कमी आहे. ही एकी अशीच ठेवून अलिबाग शहराची असलेली ओळख कायमच टिकवून ठेवा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.