जालना: ममतानगर परिसरात गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Jalna, Jalna | May 26, 2026 जालना शहरातील चंदनझिरा पोलिसांनी ममतानगर परिसरात गावठी हातभट्टी दारूच्या अवैध व्यवसायावर छापा टाकून मोठी कारवाई केली. मंगळवार दि. 26 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 1 लाख 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद अफसर सय्यद अजगर हुसेन हे सहकारी कर्मचारी पोहेकॉ वनवे, पोकॉ ढाकणे आणि मपोको महेर यांच्यासह परिसरात कारवाई केली.