साक्री शहरात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून साक्री पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही संशयितांना जेरबंद केले आहे.तर संशयितांकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्वागत करून इतर घटनांतील संशयितांनाही जेरबंद करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळनेर येथील शोभाबाई गांगुर्डे व त्यांचे पती कैलास गांगुर्डे शिरपूरहून पिंपळनेरकडे जात असतांना साक्री शहरातील गोल्डी चौकात ते उभे होते तर कैलास गांग