जालना: मनसेच्या पाठपुराव्याला यश : मस्तगड आंबेडकर पुतळा परिसरात गट्टू बसविण्याचे काम सुरू
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जालना शहरातील मस्तगड परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी मनसेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. परिसरात गट्टू बसविण्याच्या कामास सुरुवात झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी मस्तगड येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात गट्टू बसविण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती. या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा निवेदने देत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर 14 एप्रिल,