उत्तर सोलापूर: सायबर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीणच्या कारवाईत 121 मोबाईल हस्तगत: नागरिकांना परत करण्यात आले...
दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायबर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीण हद्दीतील विशेष कारवाईत १२१ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे ₹ १८ लाख १५ हजार इतकी आहे. हरवलेले अथवा चोरी झालेले मोबाईल नागरिकांनी तक्रारीद्वारे पोलिस ठाण्यात नोंदवले होते. तत्काळ तपासणीनंतर संबंधित मोबाईल हँडसेट सायबर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहितस पवार व पोलीस उपनिरीक्षक अमित करपे यांच्या नेतृत्वात जप्त करण्यात आले.