मारेगाव: घरासमोर गोंधळ घालत जातीवाचक शिविगाळ जीवे मारण्याची धमकी, मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल,
भिवाजी वार्ड येथील घटना
वणीतील दोन तरुणांनी मारेगाव येथे जाऊन एका घरासमोर गोंधळ घालत जातीवाचक शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. शुक्रवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मारेगाव पोलिसांनी दोन्ही तरुणावर ऍट्रोसिटीसह विविध गुन्हे दाखल केले.