कोरेगाव: कोरेगाव पोलिसांच्या धडक कारवाईला सराफ संघटनेचा सॅल्यूट; चोरट्याला शिताफीने पकडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोरेगाव येथील सुशील ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना प्रसंगावधान राखत पोलिसांनी शिताफीने अटक केली होती. त्यांच्या या धडक कारवाईचे सराफ संघटनेने मंगळवारी सायंकाळी सात वाजता कौतुक केले असून कामगिरीला सॅल्यूट केला आहे. शनिवार दि. 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतडा कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर असलेले सुशील ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न तीन परप्रांतीय चोरट्यांनी केला होता.