काटोल पोलिसांनी अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी प्रतिबंधित मांजा जप्त केला असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला २ लाख ५० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.काटोल पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, दोडकीपुरा येथील गळपुरा चौकाकडे जाणाऱ्या रोडवर एका दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे.