नागपूर येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जय प्रकाश द्विवेदी यांची सौजन्याने आ . देवराव भोंगळे यांनी नागपूर येथील वेकोली मुख्यालयात आज दि 12 डिसेंबर ला 1 वाजता भेट घेतली आणि राजुरा मतदारसंघातील WCL बल्लारपूर आणि WCL वणी भागात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकरी आणि पीडितांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.बैठकीत चर्चा झालेल्या सर्व मुद्द्यांची त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यालय वेकोलीने दिले.