केज: खासदार सोनवणे यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला
Kaij, Beed | Sep 23, 2025 बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खासदार सोनवणे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन शेतकरी आणि गावकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना धीर देताना त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.