फलटण: भाडळी बुद्रुक येथील मातोश्री सेवा सोसायटी चेअरमनपदी मोहनराव डांगे तर, व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र माने यांची बिनविरोध निवड
भाडळी बुद्रुक ता. फलटण येथील मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी संस्थापक मोहनराव डांगे यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र माने यांची निवड बिनविरोध करण्यात आली. सोमवार दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता चेअरमन मोहनराव डांगे यांनी माहिती दिली. भाडळी बुद्रुक येथील मातोश्री सोसायटी संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक बिनविरोध झालेवर संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी करण्यात आल्या.निवडणूक निर्णय अधिकारी एस. टी. गरुडकर यांनी काम पाहिले.