औसा: औसा तालुक्यात जोरदार पाऊस,औसा-तेर रस्ता बंद; भेटा सह दहा गावांचा संपर्क तुटला
Ausa, Latur | Sep 16, 2025 औसा -लातूर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यातील भेटा गावासह दहा गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे औसा–तेर रस्त्यावर बोरगावजवळील पुलावर पाणी वाहू लागले असून, या पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.