जालना: नांगरतास पाझर तलाव परिसरात मुरूम चोरीचा आरोप; गजानन चवडेची प्रशासनाविरोधात तक्रार करणार
Jalna, Jalna | Jun 5, 2026 परतूर तालुक्यातील नांगरतास पाझर तलाव परिसरात खडकी गावाच्या शिवारातील धरणाच्या भिंतीलगत करण्यात आलेल्या मुरूम उत्खननावरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शुक्रवार दि. 5 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते गजानन चवडे यांनी या प्रकरणात प्रशासनाच्या भोंगळ कारभारासह संभाव्य भ्रष्टाचाराचा आरोप करत मोठ्या प्रमाणात मुरूम चोरी झाल्याचा दावा केला आहे. गजानन चवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी रॉयल्टी पेक्षा जास्त उत्खनन केले.