चांदूर बाजार: सायवाडा ते घाटलाडकी रोड वरून अवैध गोवंश वाहतूक करणारा टिप्पर, पोलिसांच्या ताब्यात. तेरा गोवंशांना मिळाले जीवन दान
आज दिनांक 12 ऑक्टोंबर ला सकाळी नऊ ते साडेनऊ वाजता चे दरम्यान, सायवाडा ते घाटलाडकी रोडवर अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या टिप्पर वर मोर्शी पोलिसांनी कार्यवाही करून, तेरा गोवंशांना जीवनदान दिले आहे. एकूण 15 गोवंश टिप्पर मध्ये दाटीवाटीने कोंबून वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यावर, पोलिसांनी पाठलाग करून गोवंशासहित टिप्पर ताब्यात घेतला. पंधरापैकी दोन वर्षाचा मृत्यू झाला असल्याने उर्वरित गोवंशंना येरला येथील गोरक्षण मध्ये पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे