गडचिरोली: सांस्कृतिक भवन गडचिरोली येथे जिल्ह्यात M-Sand धोरण अंमलबजावणीबाबत प्रोत्साहनपर कार्यशाळा संपन्न
शासन निर्णय दिनांक १७ जुलै २०२५ अन्वये पर्यावरणपूरक तसेच बांधकाम क्षेत्रासाठी शाश्वत पर्याय ठरणाऱ्या कृत्रिम वाळू (M-Sand) धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत आज (१५ सप्टेंबर) नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे प्रोत्साहनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.