अंजनगाव सुर्जी: अंजनगाव सुर्जी पोलिसांची धडक कारवाई; काजीपुरा येथील घरातून चायनीज मांज्याचा साठा जप्त
अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आज दुपारी १ वाजता गुप्त माहितीच्या आधारे काजीपुरा येथील घरातून प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहात पकडले.या कारवाईमुळे परिसरातील पतंगप्रेमी व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद सादिक शेख रहीम (वय ५०, रा. काजीपुरा,अंजनगाव सुर्जी) हा आपल्या राहत्या घरातून प्रतिबंधित चायनीज मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली