आज १७ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी साडे तीन वाजता धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत नांदगाव खंडेश्वर शहराचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत रूपाने प्रवेश केला. पक्षाच्या विकासवादी विचारसरणीवर आणि पारदर्शी कार्यपद्धतीवर त्यांचा दृढ विश्वास असून, पक्षाच्या धोरणांमुळे प्रेरित होऊन त्यांनी आज हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.या प्रवेश समारंभाच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी,निष्ठावान कार्यकर्ता....