समुद्रपूर: शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील कुलूपबंद घरात चोरी; अज्ञात चोरट्याने नगदीसह १५ हजार ८३० रुपयांचे ऐवज नेला चोरुन
समुद्रपुर शहरातील शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील रहिवासी गणेश लाखे यांच्या कुलूपबंद घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन कपाटात ठेवून असलेले नगदीसह १५ हजार ८३० रुपयांचे ऐवज चोरुन नेल्याची घटना २७ जुन रोजी रात्री २ वाजता ते घरी परत आल्यावर उघडकीस आल्या माहिती आज शनिवारी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.गणेश लाखे हे आपल्या कुटुंबासह २२ जुन रोजी घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या विवाह करीता गेले होते.२७ जुन रोजी परत आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले.