समुद्रपूर: कुलरचा करंट लागुन १२ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू : मांगली गावातील घटना
समुद्रपुर तालुक्यातील मांगली येथे कुलरचा करंट लागून एका १२ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी ११ उघडकीस आली.नंदिनी अमोल गुरनुले वय १२ वर्ष असे या मुलीचे नाव आहे. मुलगी आपल्या आई वडिला सोबत गावालगत शेतात गेली होती. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नंदिनी घरी एकटीच आली. ति आपल्या घरी एकटी निघुन आली तेंव्हा तिने आल्याबरोबर कुलर लावला असता तिला कुलरचा करंट लागला परंतु घरी कोणीच नसल्याने ति तशीच पडुन राहीली काही मिनिटांनी तिचे आजोबा आले असता ती पडुन दिसली.