आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकविणे सर्वांचे प्रथम कर्तव्य झाले आहे. स्पर्धेला सामोरे जातांना विद्याथ्र्यांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ नये, तो निरोगी आणि सुदृढ रहावा, म्हणून विद्यापीठाच्यावतीने फिटनेस कॅम्पचे केलेले आयोजन आजची गरज असून विद्याथ्र्यांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सांभाळावे आणि फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनात्मक प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. आज २९ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी...