भोकरदन: पळसखेडा बे. येथे गाईला वाचवताना पाझर तलावात बुडून 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
आज दिनांक 12 ऑक्टोंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पळसखेडा बे चिराग येथे शेतकरी भाऊसाहेब जाधव वय 55 वर्ष राहणार पळसखेडा बे. हे शेत शिवारात जनावरे चालत असताना शेतातील पाझर तलावात त्यांची गाय पाणी पिण्यासाठी गेली असता ती फसली व तिला वर काढण्यासाठी गेलेले शेतकरी भाऊसाहेब जाधव हे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाले आहे, कारण भाऊसाहेब जाधव हे अपंग होते व त्यांना पोहोता सुद्धा येत नव्हते त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला .