अटलजींच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना केले. भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.