अचलपूर: परतवाडा शहरातून १६ वर्षीय मुलगी बेपत्ता, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
शहरातील एका ३६ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून तिची १६ वर्षीय मुलगी घरासमोर उभी असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी च्या तक्रारीनुसार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते ८.३० या वेळेत फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरासमोर उभी होती. तिला घरात बोलावूनही ती आली नाही. त्यानंतर फिर्यादी बाहेर पाहण्यासाठी गेल्या असता मुलगी दिसली नाही. परिसरात तसेच मैत्रिणी व नातेवाईकांच्या घरी शोध घेतला असता ती सापडली नाही. यावरून कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याची