सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर करताना सांगितले होते.जेवढ्या लाडकी बहिणी अर्ज करतील त्यांना 1500 रुपये देऊ. निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करण्यात आली.या योजनेत अफरातफर झाल्याची खुद्द आपणच जाहीर करत आहात.पण योजना सुरू केली ती तुम्हीच मग गुन्हे नेमके कुणावर दाखल करायचे.लोकांवर की सरकारवर?लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकार देणार आहे का? ऍप व पोर्टल मधील आकड्यांमध्ये तफावत का दिसत आहे.ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली त्यात सरकारनेच गडबड केली असून ते ऍप आणि पोर्टलमधील आकडेवारीत स्पष्ट दिसत आहे.