उत्तर सोलापूर: तालुक्यातील बेलाटी गावात संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न...
उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावात संत बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10 वाजता काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पालखी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मिरवणूक, कीर्तन, भजन आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तसेच परिसरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून संत बाळूमामांच्या चरणी श्रद्धा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळ आणि महिलाबालक संघ यांनी विशेष परिश्रम घेतले.