पारोळा: "प्रवक्ता अकॅडमीच्या स्पर्धेत गुणवत्तेचा सन्मान; विजेत्यांना सायकल आणि स्मृतिचिन्हांची पारितोषिके
Parola, Jalgaon | Sep 14, 2025 पारोळा, येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये "प्रवक्ता अकॅडमी" तर्फे आयोजित बेसिक नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन 2025 मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा A गट,पहिली ते चौथी,B गट,पाचवी ते सातवी आणि C गट आठवी ते 10 वी अशा तीन गटांत विभागण्यात आली होती. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांची 10 मिनिटांची बेसिक लेव्हल टेस्ट पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली.