वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून नाराजी उफाळली आहे. माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाकडून समीर देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदी नेमण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र पक्षाने अतुल वांदिले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.