माजलगाव: माजलगाव तालुक्यातील जयकोवाडी शिवारात वाघ दिसल्याचा चालकाची कॉल रेकॉर्डिंग वायरल, परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जायकवाडी शिवारात चक्क वाघ दिसला असल्याची माहिती एकाच चालकाने दिली आहे चक्क वाघ आढळून आल्याची कॉल रेकॉर्डिंग चालकाची सर्वत्र व्हायरल झाली आहे त्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नागरिकांनी जनावरांची काळजी घ्यावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीच एका एका बिबट्याने बीड जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडवली होती अनेक पशुधनाचे मोठे नुकसान केले होते मात्र पुन्हा वाघ दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.