उमरी: वसंत नगर तांडा येथे हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा नोंद
Umri, Nanded | Nov 1, 2025 दि. 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास उमरी तालुक्यातील वसंत नगर तांडा येथे आरोपी गोपीचंद सखू राठोड हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या हातभट्टी गावठी दारू रसायन किंमत 4900 चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगलेला असता तो उमरी पोलिसांना मिळून आला होता, या प्रकरणी पोहेकॉ चुकेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि सूर्यवंशी हे करत आहेत.