नवापूर: आदिवासी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करा, कृषी उत्पन्न बाजार समिती विसरवाडी येथे शेतकऱ्यांची मागणी
नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावे तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करण्यात यावा यासह विविध मागण्या संदर्भात विसरवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक सभा संपन्न झाली.