गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलीस निरीक्षक मनोज सागडे यांनी एकोणवीस डिसेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार,ई रिक्षा व बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने अटक केली आहे.अटकेतील आरोपीचे नाव शहबाज खान शेरखान, मजहर खान, शेख इरशाद यांचा समावेश आहे. आरोपीकडून ई रिक्षा बॅटरी, आणि ई रिक्शाचे तुकडे असा एकूण 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.