हातकणंगले: इचलकरंजीत उपवन हॉटेलजवळ स्वीफ्ट कारचा अपघात, चार दुचाकी, सायकलचे मोठे नुकसान, तिघे जखमी
इचलकरंजी शहरातील मेन रोडवरील उपवन हॉटेल समोर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका स्वीफ्ट कारने चार दुचाकी आणि एक सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, कारमधील दोन जण व एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.ही घटना रात्री सुमारे १ वाजता घडली.स्वीफ्ट कार इचलकरंजीकडे येत असताना, उपवन हॉटेलसमोरील खड्ड्यांमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.कार थेट रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली आणि त्यानंतर पार्किंगमधील चार दुचाकी व एक सायकलला जोरात धडकली.