गंगापूर: गंगापुर विधानसभाः मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांना दिली १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत
आज शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर -: १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत-मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे छत्रपती संभाजीनगर, दि.३० (जिमाका) जिल्ह्यातील १११ गंगापूर विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार नोंदणी संदर्भात प्राप्त तक्रारींची यादी ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व जिल्ह्याचे संकेतस्थळ येथे उपलब्ध आहेत. या याद्या पाहून दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपले नाव नेमके कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे, याबाबत पुरव्यांसह दि.३१ ऑक्टोंबर ते दि.१५ नोव्हेंबर या कालावधी देण्यात आला आहे.