भंडारा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी भंडारा शहरातील उर्वरित दोन प्रभागांमधील २ नगरसेवक पदांकरिता नगरपरिषद निवडणूक होऊ घातली आहे. याच अनुषंगाने, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान भंडारा शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालयात एक महत्त्वाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत आमदार फुके यांनी पदाधिकारी, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि उमेदवारांशी सविस्तर..