चिखलदरा: तेल्या बाबा परिसरात मालवाहू ट्रकने चौदा गायींना चिरडले
मध्यप्रदेशच्या सीमेवर सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तेल्या बाबा परिसरात आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मालवाहू ट्रक (क्रमांक MP 09 CF 5873) ने रस्त्यावर उभ्या असलेल्या गायींच्या कळपाला चिरडल्याने तब्बल चौदा गायींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. गायींचा कळप रस्त्याच्या कडेला थांबलेल्या होत्या.