दिग्रस: शहरातील आर्णी बायपास जवळ नायलॉन मांज्या गळ्यावर अटकल्याने महिला शिक्षिका जखमी
दिग्रस शहरातील आर्णी बायपास रोडवर नायलॉन मांज्यामुळे जिल्हा परिषद शिक्षिका जखमी झाली. धानोरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षिका सारिका पाटील वडे शाळेतून घराकडे परतत असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून महिला जखमी झाल्याची घटना दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान घडली. स्कार्फ बांधलेला असल्याने मोठा अनर्थ टळला, परंतु त्यांच्या गळ्याला किरकोळ दुखापत झाली.