जालना रोडवर दोन गटात जबरी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, घटनास्थळी पोलीस पोलीस दाखल
Beed, Beed | Oct 19, 2025 बीड शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धाकदपटशा उघड करणारी घटना घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या बाजूला, जालना रोड परिसरात सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास दोन गटात जबरी मारहाणीचा प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि गटांमध्ये परस्पर मारहाण सुरू झाली. दोन्ही गटातील काही युवकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांचा मारा करत मोठा गोंधळ घातला होता