आमदार नाना पटोले यांनी हिवाळी अधिवेशनात (१४ डिसेंबर रोजी दुपारी १२;२० वाजता) सोशल मीडियावरील फेक पोस्ट्स आणि अफवांचा मुद्दा उपस्थित करत सायबर विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. विधानसभा निवडणुकीदरम्यान व त्यानंतरही आपल्याबाबत जाणीवपूर्वक खोट्या पोस्ट्स पसरवून गैरसमज निर्माण करण्यात आले, ज्यातून जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, असे पटोले म्हणाले. फेक पोस्ट्स नियंत्रणात आणण्यासाठी सायबर विभाग दुर्लक्ष करत आहे काय, असा थेट सवाल करत, सरकारने या विभागाची भूमिका स्पष्ट करावी....