अकोला जिल्ह्यात दिवाळी सण शांततेत आणि सुरक्षीत पद्धतीने पार पडला. नागरिकांनी सण साजरा करताना नियमांचे पालन केले आणि कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना घडू दिल्या नाहीत. याबद्दल अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी दिनांक 22ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नागरिकांचे आभार मानले. त्यांनी नागरिकांना सुरक्षेचे महत्व लक्षात ठेवून पुढील सणही शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. पोलीस प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील सण सुसंस्कृत आणि सुरक्षित वातावरणात पार पडले.