पातुर: पातुर ठाणेदाराची गोरक्षकावर अरेरावी, सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ऑडिओ व्हायरल !
Patur, Akola | Sep 27, 2025 पातुर ठाणेदाराची गोरक्षकावर अरेरावी, ऑडिओ व्हायरल पातुर ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी गोरक्षक रणजित गावंडे यांना भ्रमणध्वनीवर उद्धट वागणूक दिल्याचा ऑडिओ २५ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. गोवंश तस्करी थांबविण्याची माहिती दिल्यावर ठाणेदार आक्रमक बनले. संतप्त गोरक्षकांनी २६ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्याकडे धाव घेऊन ठाणेदारावर चौकशी व निलंबनाची मागणी केली. प्रकरणावर चौकशीचे आश्वासन देण्यात आले.