चंद्रपूर: आझाद गार्डन येथे सांस्कृतिक तेजाची नवी पहाट; आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रेरणादायी शब्द
जिल्ह्यात असंख्य प्रतिभावान कलावंत आहे. या सर्वांना एका व्यासपीठावर आणून आपल्या जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अधिक तेजस्वी आणि समृद्ध करावा, असे प्रेरणादायी आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. संस्कृती संवर्धन मंडळाचा वतीने आझाद गार्डन येथे आज दि 22 ऑक्टोबर 8 वाजता आयोजित पहाट कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग आदींसह उपस्थित होते.