जळगाव जिल्ह्यासह तब्बल ७ जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. किशोर तेजराव वायाळ (रा. मेरा बु. ता. चिखली, जि. बुलढाणा) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दिली.